Mumbai Local Accident : कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका! मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या धडकेत एका प्रवाशांचा मृत्यू; तिघे जखमी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मोटरमनने केलेल्या आंदोलनाचा प्रवासांना मोठा फटका बसला आहे.
Mumbai Local Accident : कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका! मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या धडकेत एका प्रवाशांचा मृत्यू; तिघे जखमी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मोटरमनने केलेल्या आंदोलनाचा प्रवासांना मोठा फटका बसला आहे. रेल्वे मोटरमन यांनी सीएसएमटीमध्ये केलेल्या आंदोलनामुळे ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कामावरून सुटणाऱ्या अनेक चाकरमान्यांनी ट्रेन मिळणार नाही म्हणून फलाटावर गर्दी केली होती. त्यामुळे काही प्रवासी रेल्वे रुळावरून चालू लागले. हे प्रवासी सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान पोहोचले असता, मागून अंबरनाथ फास्ट लोकल आली. या लोकलने रुळावरून चालणाऱ्या चार प्रवाशांना उडवलं. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. तर, तीन जखमींवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Ajit Pawar On Land Scam: पार्थ पवारांवरील आरोपांनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझं नाव वापरून…’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version