Mumbai Local: मोठा अनर्थ टळला! धावत्या ट्रेनमध्ये महिलेच्या साडीचा पदर पुलाला घासला अन्…; Video व्हायरल

काही सेकंदांचा फरक पडला असता, तर ही घटना गंभीर अपघातात बदलली असती.
Mumbai Local: मोठा अनर्थ टळला! धावत्या ट्रेनमध्ये महिलेच्या साडीचा पदर पुलाला घासला अन्…; Video व्हायरल

मुंबई उपनगरी रेल्वेतील धोकादायक प्रवासाचा आणखी एक हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. दिवा–सीएसएमटी लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा जीव थोडक्यात बचावल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. धावत्या लोकलच्या दारात लटकून प्रवास करत असताना महिलेच्या साडीचा पदर रेल्वे पुलाच्या खांबाला घासल्याने काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही सेकंदांचा फरक पडला असता, तर ही घटना गंभीर अपघातात बदलली असती.

व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला लोकलच्या दारात उभी राहून बाहेरच्या बाजूला लटकत प्रवास करताना दिसते. गाडी वेगात असतानाच तिच्या साडीचा पदर पुलाच्या खांबाला स्पर्श झाल्याने आजूबाजूच्या प्रवाशांची धडधड वाढली. मात्र, सुदैवाने वेळेत प्रसंग टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा – BMC Committee Meetings : आता YouTube वर पाहता येणार महापालिकेच्या समित्यांचे कामकाज? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष 

या घटनेनंतर मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दारात उभे राहून किंवा लटकून प्रवास करू नये, असे आवाहन केले जात असले तरी, प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवासी नाईलाजाने अशा पद्धतीने प्रवास करत असल्याचे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version