शिवेसना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना सामनाच्या कार्यालयाबाहेर राऊतांविरोधात फलकबाजी करण्यात आली. मनसेच्या फलकामधून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
मनसेने सामनाच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या फलकात ‘तुम्ही ओवेसी कोणाला बोलता? संजय राऊत तुमचा हा कर्कश भोंगा बंद करा, याचा त्रास संपूर्ण महाराष्ट्राला होतोय, नाहीतर मनसे स्टाईल तुमचा भोंगा आम्ही बंद करू’, असा मजकूर फलकात लिहिण्यात आला आहे.
देशात आज हनुमान जयंतीचा उत्साह दिसत आहे. अशातच ठाण्यातही ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांकडून स्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मोठ्या प्रमाणात मनसैनिक हनुमान चालीसा पठणासाठी एकत्र आले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.