चंद्रपुरची दारुबंदी फसली असल्याचं वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. दारुबंदीमुळे मोठ्या प्रमाणात दारुमाफिया तयार झाले आहेत.
या दारुमाफियांची पोलिसांच्या अंगावर गाडी चालवण्यापर्यंतची मजल गेली आहे. तसेच दोन वर्षांत जप्त केलेल्या दारुची किमंत 180 कोटींच्या जवळपास आहे. तर मग विकलेल्या दारुची किमंत किती, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान राज्यात २०१९ साली काँग्रेसची सत्ता आल्यास चंद्रपुरात असलेली दारुबंदी उठवणार, असं वक्तव्य विजय वड्डेटीवार यांनी २०१७ साली केलं होतं.
चंद्रपुरात दारुबंदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन, मोर्चे काढण्यात आले होते. दारुबंदीसाठी अनेक महिलांनी मुंडन केलं होतं.
चंद्रपुरात दारुबंदीसाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष केल्यानंतर दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर १ एप्रिल २०१५ साली दारुबंदीचा निर्णय घेतला गेला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.