माहुल प्रकल्पग्रस्तांना दिलासा, मिळणार ३०० सदनिका

माहुल प्रकल्पग्रस्तांना दिलासा, मिळणार ३०० सदनिका

माहुल प्रकल्पग्रस्तांना ठाकरे सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. माहुल प्रकल्पग्रस्तांना लवकरच ३०० सदनिका देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात आज माहुल प्रकरणी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

माहुल प्रकल्पग्रस्तांना या ३०० घरांचा ताबा १ फेब्रुवारला देण्यात येणार आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार माहुल प्रक्लपग्रस्तांना गोराईमध्ये ३०० सदनिका देण्यात येणार आहे.

माहुल प्रकल्पग्रस्तांचे गेल्या दीड वर्षांपासून आपल्या मूळ ठिकाणी आंदोलन सुरु आहे. हक्काच्या आणि सुरक्षित ठिकाणी घर मिळण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

प्रदुषणयुक्त माहुल

माहुल भागात मोठ्या प्रमाणांवर औद्योगिक आणि केमिकल कंपन्या आहेत. हा भाग प्रदुषित आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदुषणाचं साम्राज्य आहे.

या प्रदुषणामुळे माहुलमध्ये स्थलांतर करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांना जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागत आहेत.

तसेच माहुलमधील प्रदुषणामुळे जवळपास १५० पेक्षा अधिक जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.

तानला जलवाहिनी लगतच्या आणि मुंबईतील इतर विकासकामांमुळे प्रकल्पबाधित झालेल्यांचे माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आलेले आहे.

दरम्यान लवकरात लवकर उर्वरित प्रकल्पग्रस्तांचेही माहूलमधून सुरक्षित ठिकाणी स्थालंतर करण्यात यावं, असे आवाहन माहुल प्रक्लपग्रस्त समीतीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version