ठाण्याची मयुरी युद्धभूमीतून सुखरूप परतली

ठाण्याची मयुरी युद्धभूमीतून सुखरूप परतली

मागील दोन आठवड्यापासून रशिया-युक्रेन देशामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. तर युक्रेनही रशियाला चोख उत्तर देत आहे. मात्र, युद्धादरम्यान अनेक विद्यार्थी युद्धभूमीत अडकले होते. त्यामुळे त्यांना ऑपरेशन गंगा मोहिमेतर्गत मायदेशी सुखरुप आणण्यात आले आहे. दरम्यान, ठाण्याची विद्यार्थिनी मयुरी ही मोठ्या संकटावर मात करत मायदेशी परतली आहे.

रशिया-युक्रेन या देशांमध्य सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतावे लागले. मात्र, भारतात परतताना या विद्यार्थ्यांना अनेक संकटांना समोरे जावे लागले. त्यातच युद्धानंतर १४ दिवसांनंतर युद्धभूमीतून बाहेर पडताना ठाण्याच्या मयुरी या विद्यार्थिनीला अनेक संकटांना सामोरे जावेल लागले. आणि अखेर ती मायदेशी सुखरुप परतली आहे.

मयुरी ही एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत असून युद्धजन्य परिस्थितीमुळे तीला भारताता परतावे लागले. मयरीसारख्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट टाकून मायदेशी परतावे लागले आहे. त्यामुळे या नंतरचे त्यांचे शिक्षण कसे होईल, याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना चिंता भेडसावत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version