दिशा सालियन मृत्यू प्रकरणात महापौरांची मध्यस्थी?

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात महापौरांची मध्यस्थी?

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन हीची आत्महत्या झाली नसून हत्या करण्यात आली असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या कुटुंबाला नाहक त्रास होत आहे. सालियनच्या कुटुंबाला त्रास देऊ नका, अशी विनंती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सालियनच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिशा सालियनची होणारी बदनामी पाहून सालियन कुटुंब व्यथित झाले आहेत. त्यामुळे आता सालियन कुटुंबाला त्रास देऊ नका, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. तसेच दिशा सालियनची बदनामी थांबवण्याची मागणी सालियन कुटुंबियांनी केली आहे.

दिशा सालियनच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, सालियन कुटुंबियांचा कशाशीही संबंध नाही, त्यामुळे त्यांना त्रास देणे योग्य नाही. माध्यमांवर सतत दिशाचे नाव घेतल्यामुळे कुटुंबियांना त्रास होत आहे. सालियन कुटुंब हे सामान्य कुटुंब आहे. दिशा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती. तसेच ती संवेदनशील मनाची होती, तीच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. सालियन कुटुंब भावूक झाले आहेत. त्यामुळे यापुढे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, तसेच आम्ही तुमच्या सोबत आहोत. एक महिला म्हणून, आई म्हणून मी त्यांना नक्की पाठिंबा देईल, असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले आहे.

तसेच, महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेत, चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.

नितेश राणेंचे खळबळजनक ट्वटि

भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत दिशा सालियन आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात संबंध असल्याचा दावा केला आहे. दिशा सालियनला पार्टीतून काळ्या मर्सिडीजमधून नेण्यात आले ती मर्सिडीज सचिन वाझेची आहे का? असा सवाल नितेश राणेंनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version