कोकणासह राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय

कोकणासह राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय

कोकणासह राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून शनिवारी कोकणात, तर १२ जुलैला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नागपुरात हजेरी लावली. गडचिरोलीत संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, अरबी समुद्रावरूनही येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १० ते १२ जुलै दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version