कोल्हापूरमधील संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा उत्साहात

कोल्हापूरमधील संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा उत्साहात

कोल्हापूरमधील संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा दसरा चौकात मोठ्या उत्साहात पार पडला. दसरा चौक मैदानात या सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभा करण्यात आला होता. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी दसरा चौकात श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले.

त्यानंतर सोने लुटण्यासाठी एकच झुंबड उडाली. तत्पूर्वी, पाचच्या सुमारास भवानी मंडपातून लवाजम्यासह श्री भवानीची पालखी सोहळ्यासाठी मंदिरातून बाहेर पडली. याबरोबर श्री अंबाबाई, श्री गुरुमहाराज यांच्या पालख्याही परंपरेनुसार दसरा चौकात आल्या.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे, यशराजे यांचे न्यू पॅलेस येथून मेबॅक गाडीतून पारंपरिक लवाजम्यासह दसरा चौकात आगमन झाले. पारंपरिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी जनतेला सोन्याचा अर्थात शमीच्या पानांचा स्वीकार करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version