ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान जम्बो मेगाब्लॉक

ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान जम्बो मेगाब्लॉक

ठाणे ते दिवा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते दिवा रेल्वेस्थानकाच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी रेल्वेकडून काम सुरू आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारी शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून ७ फेब्रुवारी सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत असा ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे.

या मेगाब्लॉक दरम्यान, मध्य रेल्वेच्या कल्याण ते मुलुंड या स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून लोकल किंवा मेल एक्सप्रेस धावणार नाहीत. तसेच मध्य रेल्वेमार्गावर लोकलच्या तब्बल ३५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर शंभरपेक्षा अधिक एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात  आल्या आहेत. तसेच कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही मेल गाड्या या पनवेलवरून सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान धीम्या मार्गावरन लोकल सेवा आणि काही एक्सप्रेस चालवल्या जातील.

ठाणे ते दिवा या रेल्वे स्थानकादरम्यान ३ दिवसांचा म्हणजेच ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यासाठी प्रवाशांसाठी ठाणे महानगर पालिकेने ठाणे आणि मुंब्रा या रेल्वेस्थानकांदरम्यान २०५ विशेष बससेवा चालवण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version