#Chandrayaan2 : ऑर्बिटरने संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे फोटो टीपले – इस्रो

#Chandrayaan2 : ऑर्बिटरने संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे फोटो टीपले – इस्रो

चांद्रयान 2 मोहीमेसंदर्भात आत्ताच महत्वाची माहिती हाती लागली आहे. संपर्क तुटलेले विक्रम लँडर याचा शोध लावण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रेही टिपली आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली.

चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम लँडर 2.1 किमी वर असताना संपर्क तुटला होता. संपर्काचे प्रयत्न सुरू असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले होते.  आज रविवारी चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम रलँडरसंदर्भात महत्वाची माहिती हाती लागली आहे.

विक्रम लँडरची माहिती मिळाली आहे. ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रे टिपली आहेत, असं सिवन यांनी स्पष्ट केले. विक्रम लँडर कुठे आहे याची माहिती दोन ते तीन दिवसात मिळू शकते, असं इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते.अद्याप विक्रम लँडरशी संपर्क होऊ शकला नाही. संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच संपर्क होईल, असा विश्वासही सिवन त्यांनी व्यक्त केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version