नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा

मुंबई : लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाविरोधात देशभरातून आंदोलन करण्यात येत आहेत. यातच या विधेयकाविरोधात आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांनी राजीनामा दिला आहे. आपण राजीनामा देत असल्याची माहिती अब्दूर रहमान यांनी ट्विटद्वारे दिली.

“नागरिकत्व विधेयक भारताच्या धार्मिक एकतेविरोधात आहे. मी विनंती करतो की सर्वांनी संवैधानिक पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा. हे विेधेयक घटनेच्या तत्त्वांविरोधात आहे. असं अब्दूर रहमान यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटंल आहे.

“मी उद्या म्हणजेच गुरुवारपासून ऑफिसला जाणार नाही, असंही या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. अब्दूर रहमान यांनी हे राजीनामा पत्र ट्विटरवर बुधवारी रात्री 8 वाजता हे ट्विट केलं आहे.

अब्दूर रहमान 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अब्दूर रहमान यांची नुकतीच बढती झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version