देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशात शनिवारी ४१ हजार १५७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५१८ कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी देशात ४२ हजार ४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३ कोटी ११ लाख ६ हजार ६५ वर गेला आहे, तर आतापर्यंत ३ कोटी २ लाख ६९ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ४ लाख २२ हजार ६६० रुग्ण उपचाराधीन आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.