मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलावं भरली, ‘हे’ तलाव ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलावं भरली, ‘हे’ तलाव ओव्हरफ्लो

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली. मुंबईला याआधी पाणी टंचाईच्या प्रश्नाला सामोर जावं लागणार होतं. परंतु गेल्या महिन्याभरात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील तलावांमध्ये 78.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना सुमारे 300 दिवस पुरेल इतका आहे.

अर्थात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा आता मुंबईत उपलब्ध आहे. तुळशीमध्ये 8 हजार 46 अशा सात तलावांमध्ये एकूण 11 लाख 30 हजार 90 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. तर 3 लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज  मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवायला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते.

तलावांमध्ये पाणीसाठा

अप्पर वैतरणामध्ये 56 हजार 410,
मोडक सागरमध्ये 1लाख 28हजार 925,
तानसामध्ये 1 लाख 44 हजार 122,
मध्य वैतरणामध्ये 1 लाख 89 हजार 31,
भातसामध्ये 5 लाख 78 हजार 296,
विहारामध्ये 25 हजार 260,

हे तलाव ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी तलाव 12 जुलैला ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला आहे.

तानसा तलाव 25 जुलैला तर मोडक सागर 26 जुलैला ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version