‘मी नाराज नाही, शिवसैनिक नाराज होते’ – राजेश क्षीरसागर

‘मी नाराज नाही, शिवसैनिक नाराज होते’ – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर पोटनिवडणूकीची जागा काँग्रेसला सोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ‘मी नाराज नाही तर शिवसैनिक नाराज आहेत’, अशी प्रतिक्रिया राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षनेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. तर सर्व पक्षांनी मिळून ताकदीने उत्तर कोल्हापूरची पोटनिवडणूक लढण्याचा निश्चय केला, असल्याची माहिती शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विनायक राऊत, अशोक चव्हाण, नाना पटोले, आदित्य ठाकरे उपस्थित असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

तसेच ते म्हणाले, आपण कायम शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असून फक्त कार्यकर्त्यांची काँग्रेसला मतदान करण्याची इच्छा तयार होणं महत्त्वाचे आहे. कोल्हापूर हा शिवसेनेचा बाले किल्ला असून पोटनिवडणुकीसाठी जागा काँग्रेसला सोडल्यामुळे मी नाराज नाही, तर शिवसैनिक नाराज होते. भाजपच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये राग असल्याचे राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version