पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी काम करत असलेल्या ऑफिसमध्ये घुसून चाकूने तब्बल 26 वार करुन पतीने तिची निर्घृण हत्या केली. मंगळवारी 29 तारखेला भाईंदर पश्चिम स्टेशन रोडवर असलेल्या व्यंकेटेश्वर इमारतीमध्ये ही घटना घडली. त्यानंतर पतीने स्वत:ला पोलिसांच्या हवाले केले.
मृत महिलेचे नाव वीणा भोईर (35) असून ती CAच्या ऑफिसमध्ये गेल्या 8 वर्षांपासून काम करत होती.
पतीचे नाव कुमार भोईर असून मंगळवारी सकाळी तो पत्नीच्या ऑफिसबाहेर उभा होता.
कुमारने ऑफिसच्या बाहेर आलेल्या वीणाशी वाद घातला.
त्या वादात वीणाने कुमारच्या कानशिलात लगावली.
त्यानंतर कुमारने खिशातील चाकू काढून वीणाच्या पोटात भोसकून तिची हत्या केली.
तब्बल 26 वार केल्यामुळे वीणाचा जागीच मृत्यु झाला.
कुमार आणि वीणाचा विवाह 12 वर्षांपूर्वी झाला होता.
कुमारला वीणाचा विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता.
ऑफिसमध्ये जाऊन कुमारने अनेकदा विणाला मारहाण केली होती.
कौटुंबिक वादाला कंटाळून तिने 2 जानेवारीला पतीचं घर सोडले होते.
मात्र, त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.
परंतु पतीकडे जाणार नसल्याचे तिने स्पष्ट सांगितले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.