मुंबईत हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू

मुंबईत हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले असून राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये अनलॉक निर्बंध जाहीर केले आहेत. दरम्यान, मुंबईत आजपासून हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रशासनाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत.

राज्यात गेली दोन वर्षे कोरोनाने थैमान घातले होते. तर महाराष्ट्रातील मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र, काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल केले असून मुंबईतही कोरोना निर्बंध कमी केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटवर प्रशासनाने निर्बंध घातले होते. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. मात्र, आता मुंबई प्रशासनाने निर्बंध शिथिल  केल्यामुळे आजपासून मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रशासनाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version