हिंदुस्थानी भाऊला अटक; धारावी पोलिसांची कारवाई

हिंदुस्थानी भाऊला अटक; धारावी पोलिसांची कारवाई

विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन केले. आणि त्यांच्या आवाहनानंतर राज्यभरात विद्यार्थी ऑफलाईन परिक्षेविरोधात रस्त्यावर उतरले. याप्रकरणी आता पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ यांना अटक केली आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले. तर राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, दरम्यान मुंबईतील धारावी येथील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईतील आंदोलनात हिंदुस्थानी भाऊसुद्धा सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलनाचे आवाहन देणारे हिंदुस्थानी भाऊ यांच्या विरोधात धारावी पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थी आंदोलन भडकवण्यामागे हात असल्याचा आरोप हिंदुस्थानी भाऊवर करण्यात आला आहे. तर हिंदुस्थानी भाऊ यांच्यासह इकरार खान वखार खान यासही पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदुस्थानी भाऊ यांनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही ते सहभागी झाले. परीक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे ऑफलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांबाबत खेळ का करतात? असा सवाल हिंदुस्थान भाऊ उर्फ विकास फाटक यांनी उपस्थित केला आहे.

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?

हिंदुस्थानी भाऊ यांचे खरे नाव विकास फाटक असे आहे. मात्र, समाज माध्यमांवर हिंदुस्थानी भाऊ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. विकास फाटक हे प्रसिद्ध युट्युबर आहेत. युट्युबरवर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम बीग बॉसच्या १३व्या पर्व्यामध्ये हिंदुस्थानी भाऊ स्पर्धक होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version