नील सोमैयांना उच्च न्यायालयाचा दिलासा

नील सोमैयांना उच्च न्यायालयाचा दिलासा

विक्रांत बचाव मोहिम प्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया यांचा मुलगा नील सोमैयांना उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. आयएनएस विक्रांत नीधी घोटाळाप्रकरणी नील सोमैयांवर तुर्तास कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

उच्च न्यायालयाने नील सोमैयांवर तुर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तसेच नील सोमैयांना चौकशीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नील सोमैयांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, न्यायालयाने नील सोमैयांनी तपासात सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विक्रांत बचाव मोहिम प्रकरणी सोमैया पिता-पुत्रांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने यापूर्वीच किरीट सोमैयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता न्यायालयाने नील सोमैयांनादेखील अटकेपासून दिलासा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version