गोपीचंद पडळकर यांनी मुख्यंंमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. शिरपूरचे काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही आज भाजप प्रवेश केला आहे. गोपाचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. यावेळी 2 दिवसात अजून दोन प्रवेश होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
मी भाजपचा पहिल्यापासून सदस्य आहे. भाजप आमच्या पाठीमागे म्हणून मी भाजपच्या पाठीमागे आहे त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. न्यायासाठी मी धनगर समाजाचा मोर्चा काढला मला वैयक्तिक काही नको. धनगर समाजासाठी करायचं आहे. असे ही ते म्हणाले आहे.
वंचित आणि माझ्या मध्ये कोणताही वाद नाही. प्रकाश आंबेडकर हे प्रामाणिक नेते आहेत असे ही ते म्हणाले आहेत. तर 2014 पर्यंत महाराष्ट्राकडे चांगलं नेतृत्व नव्हतं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच कौतुक केले आहे. मर्थांकांपेक्षा विरोधकांच या कार्यक्रमाकडे लक्ष लागलं आहे असं म्हणतं त्यांनी टीकाही केली आहे.
पडळकर हे पुन्हा घरामध्ये परत आले याचा आज आंनद आहे. महाराष्ट्रातील एक युवा नेता आमच्या सोबत आला. असं मत मुख्यंमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे . धनगर सामजासाठी पडवळकर भाजपामध्ये आले आहेत.
लोकसभेत पडवळकरांनी ताकद दाखवली आहे. पडवळकर वचिंत मध्ये गेल्यावर दुःख झालं असं मत ते म्हणाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.