‘गोल्डन सिंगर’ बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन

‘गोल्डन सिंगर’ बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन

संगीत विश्वातील गोल्डन सिंगर, ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बप्पी लहरी मागील महिन्यापासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांनी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

बप्पीदा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी बॉलिवूमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली.

संगीतकार बप्पी लहरी यांचा परिचय

बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ साली झाला.

१९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पीदा प्रकाशझोतात आले.

जवळपास पाच दशके बॉलिवूडवर बप्पी दा यांची छाप होती.

ऐंशी-नव्वदीच्या दशकात तरुणाईला वेड लावले.

‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटात ‘उलाला’ हे त्यांचे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले.

डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी चित्रपटांमधली गाणी लोकप्रिय झाली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version