ऐन दिवाळीत इंधन दरवाढीचा भडका उडाला

ऐन दिवाळीत इंधन दरवाढीचा भडका उडाला

  देशातील कोरोनाग्रस्त परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली आहे. अशातच भारताने शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे इंधनानेदेखील शंभरी पार केली आहे. त्यामुळे ऐन दिवळीत इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे सामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

  भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३५ पैशांनी वाढ केली आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर ११५ रुपये ५० पैसे इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी १०६ रुपये ६२ पैसे मोजावे लागणार आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी उच्चांक पातळी गाठली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शंभरी पार केली आहे. मात्र आता महागाईच्या काळात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलसाठीही जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version