मुंबई: मुंबई महापालिका मीठी नदी माहीम कॉजवेला जिथे समुद्राला मिळते तिथे “फ्लड गेट” उभारणार आहे. तसा प्रस्ताव आज एमएमआरडीए आणि बीएमसी अधिकारी आणि बीएमसी मधील समिती अध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीत मांडण्यात आलांय. हा प्रकल्प पुर्ण होण्यास तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या “फ्लड गेट” प्रकल्पामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होणार नसल्याचं पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.