पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

पुणे :  पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला असून ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली. संशयित आरोपीचे नाव तानाजी पवार असं असल्याचं महिती झालं आहे. या आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत. तसेच पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांच्यावर गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version