मुंबई, १० जुलै २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील गाजलेली अभिनेत्री वीणा जगताप ही आपल्या इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिच्या एका पोस्टमुळे.
अभिनेत्री वीणा जगताप पुन्हा मेट्रोमोनियल साइटवर फेक अकाऊंट बनवण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याचा स्क्रिनशॉर्ट सामायिक करत अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. या अकाउंटमध्ये वीणा जगतापचा व्यवसाय ‘सॉफ्टवेअर इंजिनियर’ दाखवण्यात आलं आहे.
वीणाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट सामायिक केली आहे. यात तिने ” तिचे मेट्रोमोनियल साइटवर फेक अकाऊंट बनवण्यात आल्याचं” सांगितलं आहे. यासह यात एका चाहत्याने आपल्या निदर्शनास ही बाब आणून दिली असल्याचं तिने म्हटलं. लोकं असं का करतात? हेच आपल्याला ठाऊक नसल्याचं ते म्हणाले आहेत. मागील वर्षीही असा प्रकार घडला होता असेही तिनं सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.