डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं २ वर्षांमध्ये स्मारक शक्य – शरद पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं २ वर्षांमध्ये स्मारक शक्य – शरद पवार

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंदू मिलची पाहणी केली. यावेळेत त्यांच्या सोबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि कामगार मंत्री नवाब मलिक देखील उपस्थित होते.

शरद पवारांनी यावेळेस स्मारक आखाड्याची पाहणी केली.

शरद पवारांनी यावेळी पत्रकारांसोबत बातचीत केली.

पत्रकार परिषदेत शरद पवारांनी मांडलेले मुद्दे

> डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक २ वर्षात पूर्ण करणं शक्य.

> स्मारक पर्यटनाचे आकर्षण ठरेल.

> या ईमारतीला वर्षभर लोकं पाहायला येतील.

> स्मारकासाठी काहही सूचना केल्या नाहीत.

> स्मारकाच्या उभारणीला विलंब होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

> गर्दीच्या काळात स्मारकाची काळजी घ्यावी लागेल.

> महापरिनिर्वाण दिन, आंबेडकर जंयतीला योग्य नियोजन गरजेचं

> स्मारकांच २५ टक्के काम पूर्ण झालयं.

या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2015 साली करण्यात आलं होतं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version