‘आम्हाला धमक्या देऊ नका’ – संजय राऊत

‘आम्हाला धमक्या देऊ नका’ – संजय राऊत

‘शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणारच’, अशी भूमिका आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले असून शिवसैनिक मुंबईत मातोश्री तसेच राणा दाम्पत्यांच्या मुंबईतील खार येथील घराबाहेर नाकाबंदी केली आहे. तर मातोश्रीबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. दरम्यान, याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘कोणाच्यातरी पाठबळात तुम्ही मुंबईत येऊन आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक स्वस्थ बसतील का? कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी तुम्हा आम्हाला सांगू नका, ते काय आहे सरकारने काय कराव हे सल्ले तुमच्याकडून घेण्याइतकं भिकारपण महाराष्ट्राला आलेलं नाही. हिंमत नाही घुसण्याची, बदनाम करताय, कोण तुम्ही? तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा. तुम्ही लक्ष्मणरेषा ओलांडाल तर मग शिवसैनिकांनासुध्दा चिडून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार त्यांना आहे.’, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट केले की, ‘पुरे झालं. आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी… जय महाराष्ट्र.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version