सध्या जगभरात इराण-अमेरिका युद्ध मोठ्या प्रमाणात पेटले आहे. इराण-इस्रायल असं सुरू झालेलं युद्ध आता इराण-अमेरिका असं झालं आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत. शांतता कराराची अंतिम मुदत जवळ येत असताना, त्यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे की, संपूर्ण देश एका रात्रीत उद्ध्वस्त होऊ शकतो आणि ती रात्र आजही असू शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "इराण एका रात्रीत नष्ट होऊ शकतो आणि ती रात्र शक्यतो मंगळवारची संध्याकाळ असू शकते", असेही ते पुढे म्हणाले.
जर तेहरानने करार करण्यास किंवा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यास नकार दिला, तर अमेरिका इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला करू शकते, असा इशारा ट्रम्प यांनी वारंवार दिला आहे. त्यांनी सांगितले की, तडजोड करण्यासाठी इराणकडे मंगळवार रात्री 8 वाजेपर्यंत (ईटी) वेळ आहे.
इराणमध्ये बेपत्ता झालेल्या अमेरिकन लष्करी वैमानिकाबद्दल माहिती लीक केल्याबद्दल ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका अज्ञात प्रसारमाध्यमाला धमकी दिली की, जर त्यांनी इराणमध्ये बेपत्ता झालेल्या अमेरिकन लष्करी वैमानिकाबद्दल माहिती लीक करणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड केले नाही, तर ते त्याला तुरुंगात टाकतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.