विधिमंडळात शिवजयंती साजरी करण्यावरून वाद

विधिमंडळात शिवजयंती साजरी करण्यावरून वाद

संपूर्ण राज्यभरात छत्रपत्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. मात्र, विधिमंडळात शिवजयंती साजरी करण्यावरून गदारोळ झाला. विधिमंडळात शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जात नाही, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तर मुनगंटीवार यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत. मात्र, राज्याचे अधिकारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे शिवजयंती तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचा विचार करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवजयंती साजरी करण्यावरून वाद घालू नये. याआधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्म दिनांक १९ फेब्रुवारी १६३० निश्चित करण्यात आली. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रमात उपस्थित असतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तर मविआ आणि इतर पक्षांच्या आमदारांनीही महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. विधिमंडळाच्या प्रांगणात महाराजांचा पुतळा आहे. ज्यांना अभिवादनासाठी जायचे असेल त्यांनी जायचे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version