राज्यात धुळवडीचा उत्साह

राज्यात धुळवडीचा उत्साह

गेली दोन वर्षे कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे सण-उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे सणांवरील निर्बंध हटवण्यात आले असल्यामुळे सण साजरा करताना नागरिकांमध्ये उत्साह दिसत आहे. राज्य सरकारने होळी आणि धुळवडीवरील निर्बंध हटवल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांनी होळी, धुळवड कोरोना निर्बंधमुक्त साजरा करत आहेत. मात्र, सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन गृहखात्याकडून करण्यात आले आहे.

काय आहेत नवे नियम?

कोरोनाच्या नियमांचे पालन करणे.


होळी साजरी करतान गर्दी कमी करावी.


शिमगा साजरा करताना पालखीची मिरवणूक घरोघरी न नेता मंदिरात न्यावी.


चिमुरड्यांचे पाण्याने भरलेल्या फुग्यांचे युद्ध

मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये चिमुरड्यांचे पाण्याने भरलेल्या फुग्यांनी युद्ध पाहायला मिळाले. आज लहानांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण या धुळवडीच्या रंगात, पाण्यात भिजल्याचे पाहायला मिळत आहे. चिमुकल्यानी आपल्या मित्राचे गट करून दुसऱ्या गटावर पाण्याने भरलेल्या फुग्यांचा हल्ला चढवत अनोखी धुळवड साजरी केली. एकमेकांवर फुग्यांचा हल्ला करून दुसऱ्या गटाला पाण्याने भिजवून टाकण्याचा दोन्ही गटांचा प्रयत्न असतो आणि याच प्रयत्नात दोन्ही गट पूर्ण भिजून जात या धुळवडीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version