जयश्री पाटील यांना न्यायालयाचा दिलासा

जयश्री पाटील यांना न्यायालयाचा दिलासा

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जयश्री पाटील यांना २९ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासास्थानी काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यामुळे पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. यावर आज सुनावणी पार पडली असून न्यायायाने जयश्री पाटील यांना २९ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पाटील यांना २९ एप्रिलपर्यंत अटक करता येणार नाही.

सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्याबद्दल जनभावना भडकावणारं विधान केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी त्यांना सातारा जिल्हा पोलिसांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्यांच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपला असून सातारा सत्र न्यायलयाने वकील सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version