गेल्या दीड वर्षात संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली होती. मात्र देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाने डोकं वर काढले आहे.
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आता पुन्हा झपाट्याने वाढ होत असून अशातच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. देशात ६५०हून अधिक ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आढळले आहेत.
मुंबईत कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा सातत्याने वाढ होत आहे. कोरनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र आता पुन्हा कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची पहिली लहर ही १२ दिवसांची होती. त्यामध्ये ७०६ ते १३६७ कोरोना रुग्ण आढळले तर कोरनाची दुसरी लहर २० दिवसांची असून त्यामध्ये ६८३ ते १३२५ रुग्ण आढळले आणि तिसरी लहर ४ दिवसांची असून यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून त्यामध्ये ६८३ ते १३७७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या हजारच्या घरात पोहचली. राज्यात मंगळवारी २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर यापैकी १ हजार ३७० इतके रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.