देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट

देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट

देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, सोमवारी ११८ दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णवाढ झाली आहे.

देशात सोमवारी ३१ हजार ४४३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ३१ हजार ३१५ वर पोहोचली आहे.
तर सोमवारी एकूण ४९ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३ कोटी ६३ लाख ७२० वर पोहोचली आहे.

देशात सोमवारी २,०२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर देशाचा मृत्यूदर १.३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version