कॉर्डिलिया क्रुझवरील एकूण १३९ प्रवशांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर त्यापैकी एकूण ६० कोरोनाबाधित रुग्णांची कोव्हिड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
कॉर्डिलिया क्रुझवरील १८२७ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी कोरोना चाचणीमध्ये प्रथम क्रुझच्या क्रू स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर प्रवासी, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली असता एकूण १३९ जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख वरचढच आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. बुधवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी राज्यात २६ हजार ५३८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झोली आहे. तर मुंबईत बुधवारी १५ हजार १६६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. तर ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.