मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत चांदीवाल आयोगाने १७ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, चांदीवाल आयोगाने नवाब मलिकांना दिलासा दिला आहे. नवाब मलिकांना कोणतेही समन्स पाठवले नसून ते स्वतःहून आयोगासमोर आले, असे चांदीवाल आयोगाने स्पष्ट केले आहे.
चांदीवाल आयोगाने दिलासा दिल्यानंतर नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘मी चांदीवाल आयोगाच्या विरोधात कुठलेही वक्तव्य केले नाही तसेच यापुढेही करणार नाही, आयोगाबाबत मला पूर्ण सन्मान आहे.’ तसेच सचिन वाझे व परमबीर सिंग चुकीचे वागत असतील तर त्यावर बोलण्याचा मला अधिकार आहे, असे मी आयोगासमोर म्हटले. त्यावर आयोगाने म्हटले की, होय तुमचा अधिकार आहे. त्यानंतर आयोगाने सचिन वाझेचा अर्ज रद्द केला आहे.
सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर एक पत्रक सादर केलेले. ज्यामध्ये नवाब मलिकांनी अँटिलिया स्फोटकांच्यामागे परमबीर सिंग आणि सचिन वाझे असल्याचे विधान केले. यामुळे मलिकांच्या या विधानांमुळे प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. त्याचसंदर्भात चांदीवाल आयोगाकडून नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.