काँग्रेसने अखेर आंदोलन मागे घेतले आहे. ‘मुंबईकरांना आमच्या आंदोलनाचा त्रास नको, त्यांची गैरसोय व्हायला नको, म्हणून आम्ही हे आंदोलन थांबवत आहेत’, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रसे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या सांगर बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
नाना पटोले यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे फडणवीसांच्या बंगल्यासमोर येवूनच दाखवल, अशा एकेरी भाषेत उल्लेख करत पटोलेंच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिला आहे. तसेच फडणवीसांच्या बंगल्यासमोर काँग्रेसचे आंदोलक पोहचून यासाठी पोलिसांनी नेपेन्सी रोड येते काँग्रेस आंदोलकांना अडवत याच ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.