‘शक्ती कायद्यात तक्रारदार महिला आरोपी?’, चित्रा वाघ यांची शंका

‘शक्ती कायद्यात तक्रारदार महिला आरोपी?’, चित्रा वाघ यांची शंका

राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसण्यासाठी विधानसभेत शक्ती विधेयक कायद्यास बहुमताने मंजूरी मिळाली आहे. मात्र शक्ती कायद्याच्या तरतुदींवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शंका उपस्थित केली आहे. शक्ती कायद्यांतर्गत महिलेला संपूर्ण संरक्षण मिळेल का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शक्ती कायद्याला विधानसभेत मंजूरी मिळाली. या शक्ती कायद्यांच्या तरतुदींवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. शक्ती कायद्यात तक्रारदार महिलाच आरोपी असेल का? तसेच या कायद्यात पोलीस सरकारच्या दबावाखाली कारवाई करत असतील तर महिलांना न्याय मिळेल का? असा गंभीर सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. आणि असे झाले तर शक्ती कायद्यांतर्गत महिलेला पूर्ण संरक्षण मिळणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

Chitra Wagh | ‘शक्ती कायद्यात तक्रारदार महिला आरोपी?’ | Marathi News

https://www.youtube.com/watch?v=zT6_M2EuGZ4

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महिलांवरील अत्याचारांविरोधात शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हे शक्ती कायदा विधेयक मंजूर झाल्याचे सांगितले. शक्ती कायद्यांतर्गत महिलेवरील लैंगित अत्याचार, सामुहिक बलात्कार, विनयभंग करणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हा घडल्यानंतर महिन्याभरातच महिला अत्याचारांचे गुन्हे निकाली काढण्यात येणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version