मुंबईत मोबाईल नेटवर्कची ‘ये-जा’

मुंबईत मोबाईल नेटवर्कची ‘ये-जा’

शहरातील उड्डाणपुलांवरील मोबाईल नेटवर्क टॉवरविषयीचा करार संपला आहे. तसेच मोबाईल नेटवर्क टॉवरच्या करारास मुदतवाढ देण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नकार दिला आहे. करार संपल्यामुळे पुलावरील टॉवर हटवून साहित्य जप्त करण्याची कारवाई एमएसआरडीसीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांना कॉल न लागणे, आवाज स्पष्ट ऐकू न येणे, मोबाईलचे नेटवर्क जाणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शहरातील उड्डाणपुलांवर मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क टॉवर आहेत. या टॉवरसाठी एमएसआरडीसी आणि मोबाईल नेटवर्क कंपनीमध्ये करार होतात. मात्र, शहरातील उड्डाणपुलांवरील मोबाईल नेटवर्क टॉवरविषयीचा करार संपला आहे. तसचे नेटवर्क टॉवरच्या करारास मुदतवाढ देण्यास एमएसआरडीसीने नकार दिला आहे. तसेच याप्रकरणी कारवाईला सुरूवात झाली आहे. सध्या १०० टॉवर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोबाईल संबंधित अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईकरांना मोबाईल फोनवरून संवाद साधण्यास अडचणी येत आहेत.

एमएसआरडीसीकडून टॉवर बंद करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे कोरोनाकाळात मुंबईतील दूरसंचार सेवा अबाधित राखण्यासाठी योग्य पाऊल उचलावे, असे पत्र केंद्रीय दूरसंचार सचिव के. राजारामन यांनी राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांना लिहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version