मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन

मेट्रो २ अर्थात दहीसर ते डी. एन. नगर, अंधेरी आणि मेट्रो ७ अर्थात डहाणूकरवाडी ते दहिसर पश्चिम मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या सगळ्यांसह मान्यवरांची उपस्थिती आहे. दरम्यान, मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाही दिले तरीही हरकत नाही मात्र प्रकल्प मार्गी लावा, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

LIVE :

https://youtu.be/_osjyFRJMlM

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेट्रो प्रशासनाकडून पुष्पपुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्यासह इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. 

मेट्रोला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मेट्रोच्या दोन्ही मार्गाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचे पहिले तिकीट घेतले असून मुख्यमंत्री आरे ते कुरार असा मेट्रोतून प्रवास करत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेही आहेत. या मेट्रोसेवेमुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version