‘वर्धा शहर पक्षी निवडणुकी’ची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

‘वर्धा शहर पक्षी निवडणुकी’ची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

वर्धा शहर पक्षी निवडणुकीत 2018 मध्ये शहर पक्षाची वर्धेकरांकडून निवड करण्यात आली होती. या अनोख्या ठरलेल्या शहर पक्षी निवडणुकीची दखल लिम्का बुकने (Limca Book of Records) घेतली आहे. ही निवडणूकच लिम्का बुकसाठी रेकॉर्ड ठरली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या अनोख्या निवडणुकीची नोंद झाली आहेत.

सन 2018मध्ये वर्ध्यात बहार ‘नेचर फाउंडेशन’ आणि नगर परिषदेच्या वतीने शहर पक्षी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये तांबट, धिवर, ठिकपकेवाला पिंगळा, निलपंख आणि कापशी घार असे पाच पक्षी निवडणुकीच्या रिंगणात होते, या निवडणुकीत 51 हजार 267 मते पडली होती, 29 हजार 865 मते घेऊन ‘निलपंख’ हा पक्षी शहर पक्षी निवडून आला.

या निवडणुकीत विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता. 22 हजार 915 एवढ्या मताधिक्याने वर्धेकरांनी निलपंख या पक्षाला पसंती दर्शविली होती. या अनोख्या निवडणुकीची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे, लिम्काने आपल्या रेकॉर्डमध्ये याची नोंद केली आहे, तसं प्रमाणपत्र बहार नेचर फाउंडेशनच्या पक्षी मित्रांना देण्यात आलेय.

पक्षी निवडणुकीत वर्धा शहरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती, प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस आणि मतमोजणीच्या प्रसंगाची स्वतः पक्षी मित्र मारोती चितमपल्ली यांनी प्रशंसा केली होती. 23 जून ते 15 आगस्ट अशी 54 दिवस चाललेल्या या निवडणुकीच्या लिम्का नोंदीचा आंनद वर्ध्यातील पक्षीमित्रांनी साजरा केला आहे. पक्षी निवडणुकीच्या या अनोख्या उपक्रमाची लिम्का नोंद वर्धेकरांसाठी मानाचा तुराच म्हणावा लागेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version