चित्रा वाघ यांचा महिलांबाबत मविआवर घणाघात

चित्रा वाघ यांचा महिलांबाबत मविआवर घणाघात

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी अधिवेशनात राज्यातून २५ महिला गायब असल्याची माहिती दिली होती. त्यावर आज भाजपा नेत्या चित्र वाघ यांनी प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे. २५ महिला गायब होण्याच्या मुद्द्यावरतुन राज्यात गृहमंत्री, नेते आणि सर्वच गायब होत असून, सरकारच्या नाकाखाली हे सर्व सुरु आहे, मग पोलीस यंत्रणा सेलिब्रेटींच्या दावणीला बांधली आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

महिला गायब होण्यात महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक लागत आहे, मग महाराष्ट्रात महिलांच्या तस्करीचे रॅकेट सुरु झाले का? तसेच, हे सरकार आहे की कसाई? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावरून भाजप नेते चित्रा वाघ यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. त्या ट्विटमध्ये म्हणाल्या, राज्यात नेमकं काय चाललय? राज्यात कधी पोलीस आयुक्त गायब होतात तर कधी गृहमंत्री गायब होतात, तर कधी मुख्यमंत्री गायब होता. आणि आता तर राज्यातील ६३ हजार महिला गायब झाल्या आहेत. त्यातील काही महिला सापडल्या आहेत, तर २५ हजार महिला अद्यापही गायबच आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version