मुंबईतील मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील लोकल सेवेला सोमवारी तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर बांधकाम साहित्य पडल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनेमुळे कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने धावणाऱ्या लोकल गाड्या सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळेत सेवा विस्कळीत झाल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
मुलुंड स्थानक परिसरात ओव्हरहेड वायरवर बांधकाम साहित्य पडल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली. परिणामी धीम्या मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून काही गाड्या खोळंबल्या. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत राहिली.
लोकल सेवा उशिराने धावत असल्याने मुलुंड स्थानकासह मार्गावरील इतर स्थानकांवरही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कामावर जाणाऱ्या तसेच इतर प्रवाशांना या विलंबाचा मोठा फटका बसला. कल्याण आणि सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलच्या विलंबामुळे अतिरिक्त वेळ प्रवासात घालवावा लागत आहे.
दरम्यान, वाहतूक खोळंबल्याने काही प्रवाशांनी लोकलमधून उतरून ट्रॅकवरून पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करून लोकल सेवा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि ट्रॅकवरून पायी प्रवास करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.