ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची (Central Rail) वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली. टिटवाळा आणि खडवली स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे कसारा-कल्याण दरम्यनची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाशिंद, आसनगाव, खडवली दरम्यान अनेक लोकल्स ट्रॅकवर अडकून पडल्या. मात्र आता लोकल सुरू झाल्या आहेत. कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक 25 मिनिट उशिराने होत आहे. या सर्व प्रकारामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.