Byculla Police Station Fire: मोठी बातमी! भायखळा पोलिस ठाण्याला लागली भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना

काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Byculla Police Station Fire: मोठी बातमी! भायखळा पोलिस ठाण्याला लागली भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना

दक्षिण मुंबईतील भायखळा पोलिस ठाण्यात रविवारी आग लागल्याची घटना घडली. पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली असून, घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचाव आणि अग्निशमन कार्य सुरू करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आगीमुळे पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील काही भागाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version