मुंबईतील कुर्ला (पूर्व) भागात इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना या घटनेला एक दिवस उलटत नाही ताच आज कल्याण पश्चिममधील रामबाग येथे अतिधोकादायक असलेली एक मजली इमारत आज (बुधवार) सकाळी कोसळली.
कल्याण रामबाग परिसरात बुधवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले असून दोन जणांना सुखरूप बाहेर काढले
या इमारतीत राहत असलेले दोन जणांवर इमारतीचा ढिगारा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, प्राथमिक उपचार सुरू असताना त्यातील एकाचा मृत्यू झाला.अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले असून दोन जणांना सुखरूप बाहेर काढले
मुंबईत पावसाळा सुरू झाला की दरवर्षी इमारत कोसळण्याच्या घटना घडतचं असतात यात अनेक लोकांचा बळी देखील जातो. यंदाचा पावसाळा सुरू होत असतानाच मंगळवारी कुर्ल्यातील नाईक नगर परिसरातील ४ मजली इमारत कोसळली तर बुधवारी कल्याण पश्चिममधील रामबाग येथे एक मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे . आजच्या दुर्घटेनत एकाचा मृत्यू झाला असून . अशा घटनांमुळे जुन्या आणि धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.