मुंबईनजीक असलेल्या डोंबिवलीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकराने प्रेयसीनवर वार केल्याची घटना घडली आहे. प्रेयसीवर वार केल्यानंतर या प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याने हल्ला केला असल्याचं समजत आहे. या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.
विशेष म्हणजे शिक्षण घेत असलेल्या प्रियकराने स्वत:ला सुद्धा जखमी करून आत्महत्ये करण्याचा प्रयत्न केलाय.
डोंबिवली पश्चिमेतील रेती बंदर रोड परिसरात ही घटना घडली आहे. ही पीडित तरुणी याच परिसरात राहणारी आहे.
ही तरुणी टूर्स अँड ट्रॅव्हलमध्ये कामाला आहे. तिचे एका महाविद्यालयीन विद्यार्थीसोबत प्रेम संबंध होते. मात्र आता ती प्रेमसंबंध ठेवण्यास आपल्या प्रियकर घनश्याम देवरशेट्टीला नकार देत होती.
घनश्यामने 28 फेब्रुवारीच्या सायंकाळी तरुणीवर धारदार शास्त्राने वार केला. तसेच स्वतः ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मात्र काही नागरिकांनी मध्यस्थी केली. यामुळे या तरुणीचा जीव वाचला.
घनश्याम याला विष्णूनगर पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तसेच घनश्यामला पोलिसांनी अटक केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.