केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवले होते. मात्र नारायण राणे चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे पोलिसांनी थेट नारायण राणे यांच्या घरावर नोटीस चिटकवली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी भाजपा खंबीर असल्याचे फडणविसांनी सांगितले आहे.
याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मविआ सरकारमधील पोलिसांना दरोडेखोर, बलात्कार करणाऱ्या आरोपींना पकडायला वेळ नाही, मात्र नारायण राणेंच्या घरावर नोटीस चिकटवायला पूर्ण वेळ आहे. मात्र आम्ही नारायण राणेंच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
राज्यात अनेक अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. मात्र यावर कारवाई न करता त्यांना राणेंच्या घरी जाऊन नोटीस चिकटवायला वेळ आहे. त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. असे बोलत फडणवसींनी महाविकास आघाडी सरकारकार टीका केली आहे.
पोलिसांनी कारवाई करताना नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत याचे भान ठेवावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. तसेच पोलीस महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत काम करत असल्याचा आरोपही प्रविण दरेकर यांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.