खुशखबर : बेस्टचा तिकीट दर कमी होणार?

खुशखबर : बेस्टचा तिकीट दर कमी होणार?

लोकलप्रमाणेच मुंबईची लाईफलाइन असणारी लालपरी म्हणजेच बेस्टने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. बेस्टचा ताफा काही दिवसांतच दुपटीनं वाढत असतानाच तिकीट दर कमी करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घातला आहे. आर्थिक तोट्यात सुरू असूनही काही दिवसातचं तिकीट दर कमी होणार असं सांगितलं जात आहे. तसेच या बसताफ्यातही 7000 हजारांनी वाढ होणार आहे.

बेस्टचे दर कमी होणार

आर्थिक तोट्यात सुरु असलेल्या बेस्टचा ताफा काही दिवसांतच दुपटीनं वाढत असतानाच तिकीट दर कमी करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

पहिल्या पाच किमीसाठी अवघे 5 रुपये तिकीट आकारलं जाणार आहे. सध्या हे तिकीट पहिल्या पाच किमीला 8 रुपये आहे.

एसी बसच्या पहिल्या टप्प्यासाठीही केवळ 6 रुपये तिकीट आकारले जाणार आहे. बेस्ट उपक्रमाने तिकीट दर कमी करावे, अशी मागणी अनेक वर्षे होत आहे.

पण आर्थिक अडचणींमुळे ते शक्य होत नव्हते. आता पालिकेने आर्थिक निधी पुरवितानाच खासगीकरणाचा निर्णय घेतल्याने बसताफा 7 हजारांपर्यंत वाढणार आहे.

त्यातच आता मुंबईकरांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे. सध्या बेस्टचे किमान (2 किमी) तिकीट 8 रुपये असून, ते आता 5 किमीपर्यंत 5 रुपये होणार आहे.

हा प्रस्ताव आज, शुक्रवारी होणाऱ्या बेस्ट समिती बैठकीत चर्चेसाठी येणार आहे.

नव्या प्रस्तावानुसार 5 किमीपर्यंतच्या प्रवासासाठी 5 रु., 10 किमीसाठी 10 रु., 15 किमीपर्यंत 15 रु. व 15  किमी पुढील अंतरासाठी 20 रु. तिकीट असेल. दैनंदिन पासचे दर 50  रु. असतील.

प्रस्तावित तिकीट दर

अंतर साधी बस एसी बस

5 किमी 5 रु. 6 रु.

10 किमी 10रु. 13 रु.

15 किमी 15५ रु. 19 रु.

15 किमीपुढे 20 रु. 25  रु

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version