बँक कर्मचारी या दिवशी जाणार संपावर

बँक कर्मचारी या दिवशी जाणार संपावर

बँकांच्या अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. बँक कर्मचारी संघटनांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने गुरुवारी त्यांची भूमिका स्पष्ट केली. विविध मागण्यांसाठी संघटनांनी ३० आणि ३१ जानेवारी रोजी दोन दिवसांची संपाची हाक दिली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाच्याअधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. ३० आणि ३१ जानेवारी बँकांचा संप झाल्यास बँका सलग चार दिवस बंद राहतील. ग्राहकांच्या सेवांवर त्याचा थेट परिणाम होईल. २८ जानेवारी रोजी चौथा शनिवार तर २९ जानेवारी रोजी रविवार आहे.

एआईबीईएचे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी याविषयीची सांगोतले आहे. त्यानुसार, युएफबीयूची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. अनेकदा अर्ज करुनही भारतीय बँक संघाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे संपाचे हत्यार उपासण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

बँकेत ५ दिवसांचा कामाचा आठवडा असावा, पेन्शन अपडेट करावी. एनपीएस समाप्त करावी. वेतन सुधारणा करावी. सर्वच विभागात तात्काळ भरती करण्यात यावी, अशा मागण्या बँक संघटनेने केल्या आहेत. त्यासाठीच त्यांनी हा बंद पुकारला आहे. यापूर्वीही बँक संघटनांनी संपाची हाक दिली होती. संपामुळे ATM सेवाही प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित काही कामकाज करायचे असेल तर या दिवशीपूर्वीच ते उरकून घ्या. त्यामुळे कामात अडथळा येणार नाहीत. बँकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर संप मागे घेतला जाईल. पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर संप अटळ असल्याचे सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version