मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचा रविवार १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यातून असंख्य शिवसैनिक मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गर्दीचा अंदाज घेऊन मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क मैदानावर विशेष नियोजन केले आहे. पोलीस बंदोबस्ताचीही व्यवस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी सकाळीच स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.